मुंबई

...अशी जिंकू शकता कोरोनाविरोधातील लढाई 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना या विषाणूजन्य आजाराने थैमान घातले आहे. हा आजार रोखण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्‍यक आहे. हा आजार मानवाच्या हाताद्वारे पसरण्याची अधिक शक्‍यता असते. त्यामुळे त्यासाठी वैयक्तीक स्वच्छतेवर अधिक भर देणे गरजेचे आहे. तसेच साबणाने योग्य पद्धतीने हात धुणे आवश्‍य आहे, असा सल्ला वैद्यकिय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

साबण आणि स्वच्छ पाण्याचा वापर हात धुण्यासाठी करावा. पाणी नसेल अशा ठिकाणी सॅनिटायझर नक्कीच पर्याय म्हणून वापरू शकता. मात्र त्यापेक्षा साबण उत्तम प्रकारे निर्जंतुकीकरण करू शकते. त्यामुळे हातांच्या स्वच्छतेसाठी सॅनिटायझरच पाहिजे, असा आग्रह नको. किमान 20 सेकंद ठरावीक पध्दतीने हात धुतल्यास हाताचा प्रत्येक भाग स्वच्छ होईल. त्यामुळे कोविड-19 विरोधात लढण्यासाठी हात धुणे हे एक प्रभावी शस्त्र आहे, असे म्हणायला हरकत नाही, असे मुंबईतील ग्लोबल हॉस्पीटलच्या इंटरनल मेडिसिन कन्सल्टंट डॉ मंजुषा अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

हात कधी धुवणार? 

- जेवण तयार करण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर 
- जेवण करण्यापूर्वी 
- आजारी व्यक्तीची काळजी घेण्यापूर्वी आणि नंतर 
- शौचालय वापरल्यानंतर 
- डायपर बदलल्यानंतर किंवा ज्या मुलाने शौचालयाचा वापर केला आहे, त्याची स्वच्छता केल्यानंतर 
- खोकला किंवा शिंका येणे 
- प्राणी, प्राणी आहार किंवा जनावरांच्या कचऱ्याला स्पर्श केल्यावर 
- कचऱ्याला स्पर्श केल्यावर 
- आजारी व्यक्तीला भेटण्यापुर्वी व भेटल्यानंतर 

हात धुण्याची योग्य पध्दत कोणती? 
- वाहत्या पाण्यात हात ओले करावेत 
- हातावर पुरेसा साबण घ्यावा 
- दोन्ही हातांना मागून-पुढून व बोटांच्या मधल्या भागात कमीत कमी 20 सेकंद चोळावे 
- स्वच्छ पाण्याने हात व्यवस्थित धुवावेत 
- हात धुतल्यानंतर स्वच्छ रुमालाने हात कोरडे करावेत 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay Divorce Case : मुख्यमंत्री विजय थलपती यांचे विवाहबाह्य संबंध? घटस्फोट प्रकरणातील सुनावणीबाबत मोठी अपडेट समोर; दोघांनाही कोर्टात राहण्याचे आदेश

Online Scam : मुंबईची घटना! मोबाईल गरम होताच बँक अकाऊंटमधले 70 हजार गायब, फ्रॉड नेमका काय? सुरक्षित कसं राहायचं पाहा

Latest Marathi News Live Update : कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय! विहिरीत उडी मारून केला निषेध

India A Squad Change: भारतीय संघात सलग दोन पराभवांनंतर अचानक बदल; 150 KPH वेगानं गोलंदाजी टाकणाऱ्या खेळाडूची निवड

Telegram Ban India : NEET परीक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; टेलिग्रामवर तात्पुरती बंदी, 'या' तारखेपासून पुन्हा होणार सुरू

SCROLL FOR NEXT